उमेदवारीवरून गोंधळात गोंधळ
पुणे, ता. १७ ः नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात सध्या तरी काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच लढतीचे चित्र दिसून येत आहे. याउलट महाविकास आघाडीत मात्र अद्याप तरी एकजूट असल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात अर्ज माघारीनंतर अधिक चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील चौदा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवार अखेरचा दिवस गडबडीचा ठरला.
इंदापूर नगरपरिषदेमध्ये प्रदीप गारटकर यांनी वेगळी भूमिका घेत, नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे प्रवीण माने यांनी पाठिंबा दिला आहे. सासवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार आहे. दौंडमध्ये भाजपने स्वतःचा उमेदवार दिलेला नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध स्थानिक नागरिक हित संरक्षण आघाडी निवडणूक रंगणार आहे. शिरूरमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिला असून युतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र बघण्यास मिळाले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेत महायुतीमधील घटक पक्षांनीच एकमेकांच्या समोर उमेदवार उभे केले आहेत.
कट्टर विरोधक एकत्र
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. माळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत आघाडी झाली आहे. राष्ट्रवादी नगराध्यक्षपदासह बारा जागांवर तर तावरे यांच्या जनमत विकास आघाडीला सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत टोकाला गेलेला विरोध अचानक मैत्रीमध्ये रुपांतरीत झाला आहे.
ठळक घडामोडी
- स्थानिक पातळीवर स्वबळाचा अजेंडा पुढे रेटताना अनेक पक्षांनी अनपेक्षित राजकीय तडजोडी करत परस्परविरोधी व मित्रपक्षांविरुद्ध उमेदवार उभे केले
- प्रामुख्याने इंदापूर, बारामती आणि चाकण येथील घडामोडींनी विशेष उत्सुकता वाढवली आहे
- बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिरंगी लढत
- जुन्नरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि शिवसेना एकत्र
- चाकणमध्ये दोन्ही शिवसेना मनिषा गोरे यांच्या नगराध्यक्षपदासाठी एकत्र
- युतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र असली तरीही स्थानिक नेत्यांना निर्णयास मुभा दिल्याने भोरमध्ये भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या संग्राम थोपटे आणि आमदार शंकर मांडेकर या दोघांनीही शक्तिप्रदर्शन करत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

