पुणे- मुंबई रेल्वेसेवा 
रविवारपासून विस्कळित 
लोणावळ्यातील कामामुळे तीन दिवस ‘ब्लॉक’

पुणे- मुंबई रेल्वेसेवा रविवारपासून विस्कळित लोणावळ्यातील कामामुळे तीन दिवस ‘ब्लॉक’

Published on

पुणे, ता. ५ ः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा स्थानकाच्या यार्डमध्ये रिमॉडेलिंग व आर अँड डी मार्गिकेचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यासाठी ७, ८ व १० डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. याचा थेट परिणाम पुणे - मुंबई दरम्यानच्या रेल्वे सेवेवर होणार आहे. मेल एक्स्प्रेस गाड्यासह लोकलची सेवा देखील मोठ्या प्रमाणात विस्कळित होणार आहे.

दोन दिवसात १४ रेल्वे रद्द
शनिवारी रद्द : पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस व पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.
रविवारी रद्द : मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस.
मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस.
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस .
मुंबई - पुणे- मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस.
मुंबई- पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस.
-----------
या गाड्या उशिराने धावतील
जोधपूर–हडपसर एक्स्प्रेस, ग्वाल्हेर–दौंड, मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेस, पनवेल- नांदेड एक्स्प्रेस. या गाड्या एक ते तीन तास उशिराने धावतील. या रेल्वे ६ व ७ डिसेंबरला धावणाऱ्या आहेत.
------------
या गाड्यांना ४५ मिनिटांचा उशीर :
- राजकोट–कोईम्बतूर, कुर्ला - चेन्नई, पुणे–जयपूर,पुणे–एर्नाकुलम
-------------

Marathi News Esakal
www.esakal.com