पती-पत्नींच्या कलाकृतींचे बालगंधर्व कलादालनात विशेष प्रदर्शन

पती-पत्नींच्या कलाकृतींचे बालगंधर्व कलादालनात विशेष प्रदर्शन

Published on

पुणे, ता. ८ ः संवाद, पुणे आणि आर्टवाला फाउंडेशन यांच्यातर्फे देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘श्रद्धांचे चतुर्वे : प्रतिभावान जोडप्यांचे चित्रांकन’ या अनोख्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकार पती-पत्नींच्या कलाकृती मांडणारे हे प्रदर्शन गुरुवार (ता. ११) ते शनिवार (ता. १३) या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात भरविण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com