शोध मोहिमेद्वारे राज्यात आढळले ५ हजार रोगी
पुणे, ता. ९ ः राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या १४ दिवसांत अपेक्षित लोकसंख्येपैकी तब्बल ९६.८ टक्के लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. २ डिसेंबरपर्यंत राज्यातील ८ कोटी ५९ लाख नागरिकांपैकी ८ कोटी ३१ लाख नागरिकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात आली. त्याद्वारे ४ लाख ३७ लाख संशयित कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले आहेत, तर ४ हजार ९४२ रुग्णांना कुष्ठरोगाचे निदान झाले आहे.
पुण्यात ५४ लाख ५५ हजारांपैकी ५२ लाख ८५ हजार रुग्णांची तपासणी पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यापैकी संशयित रुग्णांची संख्या १६ हजार ४८ व निदान झालेले १२५ आहेत, तर कोल्हापूर, मुंबई, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर, सातारा, रायगड, जळगाव आदी जिल्ह्यांनी ९५ ते १०० टक्क्यांपेक्षा जास्त तपासणी केली आहे, तर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना भेट दिल्याची नोंद केली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १०५ टक्के लोकसंख्या तपासून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तपासणीदरम्यान संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यापैकी ४.३७ लाख रुग्णांची तपासणीही पूर्ण झाली आहे. या तपासणीत संशयितांपैकी सरासरी ८५.९ टक्के रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे.
-------------------
रुग्णांवर उपचार सुरू
निदान झालेल्या कुष्ठरुग्णांची संख्या राज्यात ४ हजार ९४२ पर्यंत पोहोचली आहे. जिल्हानिहाय पाहता चंद्रपूर (४०५ रुग्ण), गडचिरोली (२८६), नागपूर (२९१), यवतमाळ (२५८), सोलापूर (१११) हे जिल्हे पुढे आहेत. काही जिल्ह्यांत रुग्णप्रमाण कमी असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारामध्ये रुग्णसंख्या तुलनेने कमी आढळली. राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मोहिमेला मिळत असलेला प्रतिसाद समाधानकारक असून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
------------------
कुष्ठरोग शोध मोहिमेत दररोज घराघरांत भेट देऊन पांढरे डाग, मुंग्या येणे, संवेदना कमी होणे यांसारखी लक्षणे तपासली जात आहेत. १४ दिवस पूर्ण झालेल्या या टप्प्यानंतर पुढील उपचार व नोंदणी प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे.
- डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, कुष्ठरोग व क्षयरोग विभाग
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

