बारा डिसेंबरपासून रक्तदान शिबिर

बारा डिसेंबरपासून रक्तदान शिबिर

Published on

पुणे, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (ता. १२) आणि प्रतिभा पवार (ता. १३) यांच्या वाढदिवसानिमित्ताने पक्षातर्फे आरोग्य व रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. हे शिबिर येत्या १२ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान राज्यभर राबविण्यात येणार असून ८५ हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १२) शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळील पक्षाच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप व डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ. सुनील जगताप यांनी दिली.

संभाजी ब्रिगेडतर्फे बाबा आढाव यांना श्रद्धांजली
पुणे : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सौरभ खेडेकर, संतोष शिंदे, मनोज गायकवाड, सिद्धार्थ कोंढाळकर, महादेव मातेरे, रामा कसबे, गौरी कांबळे, प्रीतम कोंढाळकर उपस्थित होते.

काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे : काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे काँग्रेस भवन येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये फिरते वाचनालय माध्यमातून वाचन सेवा देणाऱ्या विनया डोईफोडे, महापालिका सफाई कर्मचारी अंजू माने, लाठी-काठीचा खेळ सादर करणाऱ्या ८८ वर्षांच्या शांता पवार, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला लोखंडे, पीएमटी सेवेतील कंडक्टर शीला भोसले अशा या विविध क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, मेहबूब नदाफ, राज अंबिके, गुलाम हुसेन, अनिता धिमधिमे, प्रियांका मधाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा सावंत यांनी केले; तर आभार उषा राजगुरू यांनी मानले.

मोबाईलचा वापर कमी करण्याची शपथ
पुणे : जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू. म. वि. मराठी शाळेतील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम आणि पुस्तकवाचन करीत मोबाईलचा कमीतकमी वापर करण्याची शपथ घेतली. तसेच ‘चला आपण डिजिटल डिटॉक्स होऊया आणि बालपणाचा खरा आनंद लुटू या’ अशा आशयाचा संदेश देणारे फलक बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. मराठी शाळेतील पटांगणात लावण्यात आले होते. त्याभोवती एकत्र येत मोबाईलचा कमीतकमी वापर करण्याची सामूहिक शपथ घेतली. सुरुवातीस विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम केला. साईनाथ मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीस साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शाह यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सच्या संस्थापक रेखा चौधरी, सदस्या वैशाली चव्हाण, नूमविच्या शाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर, साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शाह, गंधाली शाह, विजय चव्हाण, प्रल्हाद थोरात, गोविंदा वरंदाणी, मुख्याध्यापिका अनुजा कांगणे, प्राचार्य प्रकाश कांबळे, शिक्षिका वर्षा साबळे, नितीन शेंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com