बहुतांश राजकीय पक्षांकडून इच्छुकांना अर्जाचे वाटप
पुणे, ता. ९ ः महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने इच्छुकांना अर्ज वाटपासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आत्तापर्यंत २६६ इच्छुकांनी अर्ज नेले आहेन, तर सव्वादोनशेहून अधिक जणांनी पक्षाकडे अर्ज भरून जमा केले आहेत. भाजपने सोमवारी इच्छुकांना अर्ज वाटप सुरू केले होते, त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार जणांनी अर्ज नेले होते. मंगळवारी अर्ज वाटपाचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार, दोन दिवसात अडीच हजार अर्ज इच्छुकांनी नेले. त्यामध्ये २ हजार ३०० जणांनी अर्ज भरून दिले. पक्षाकडून बुधवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रसिद्धिप्रमुख संजय मयेकर यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून अर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी १८५ अर्ज इच्छुकांनी नेले. १३ डिसेंबरपर्यंत अर्ज दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापर्यंत ३५० हून अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप अर्ज वाटप सुरू झालेले नाही.
--------------

