‘वंदे भारत’च्या स्लीपर डब्याचे मार्चपासून उत्पादन डब्याची कारबॉडी तयार ः प्रवाशांना पुढच्या वर्षात प्रवास घडणार
पुणे, ता. १० ः ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या स्लीपर व्हर्जन (शयनयान) डब्याचे उत्पादन मार्च २६ पासून सुरु होत आहे. लातूरच्या मराठवाडा कोच फॅक्टरीत या डब्याचे कारबॉडी (मुख्य सांगाडा) यशस्वीरीत्या तयार करण्यात आली. मार्चपासून कारबॉडीच्या आधारे प्रत्यक्षात नवीन डब्याचे उत्पादन सुरु होत आहे. यात प्रथम श्रेणीच्या डब्याचा देखील समावेश आहे.
लातूरच्या कोच फॅक्टरीत चेन्नई येथील एका कंपनीत तयार केलेल्या डब्याची ‘कारबॉडी’ दाखल झाली. यासह प्रथमश्रेणीच्या डब्याचे आरेखन तयार असून, त्याला रेल्वे बोर्डाची मंजुरी देखील मिळाली आहे. डब्यांच्या उत्पादनासंदर्भात रेल्वे बोर्ड व ‘किनेट’ या कंपनीचा करार झाला. प्रत्यक्षात डब्यांच्या उत्पादनाला मार्च २६ मध्ये उत्पादन होण्यास सुरुवात होईल. जून २०२६ पर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसचे एक स्लीपर रेक तयार होईल. त्यानंतर डब्याच्या उत्पादनाला गती येणार आहे. ‘किनेट’ कंपनीच्या माध्यमातून डब्यांचे उत्पादन होणार आहे. लातूर फॅक्टरीत सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी आधुनिक मशिनच्या साहाय्याने डब्याचे उत्पादन केले जाणार आहे. लातूर येथील मराठवाडा रेल कोच कारखाना हा ३५१ एकरमध्ये आहे. ११ प्रगत असेंब्ली स्टेशन सुसज्ज बनविण्यात आले आहेत. तसेच कार बॉडी शॉप, वेअरहाऊस, असेंब्ली, टेस्टिंग, बोगी आणि पेंट शॉपसह विविध विशेष कार्यशाळा तयार करण्यात आले आहे. कारखान्याच्या अंतर्गत ८.६ किलोमीटर लांबीचा ट्रॅक आहे. याच ठिकाणी डब्याची चाचणी घेतली जाणार आहे.
---------
टप्याटप्याने डब्याचे उत्पादन होणार :
- लातूर येथील कारखान्यात १९२० डब्याचे उत्पादन केले जाणार
- पहिल्यांदा २ रेक अर्थात ३२ डबे तयार केले जाणार
- हळूहळू डब्याचे उत्पादन वाढवले जाईल.
- डब्याची देखभाल व दुरुस्ती बंगळूर, दिल्ली व जोधपूर येथे होणार
-----------------
अशी आहे वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस :
वेग ताशी : १६० किलोमीटर
एकूण डबे : १६
प्रवासी क्षमता : ८२३
प्रत्येक डब्यात : छोटी पॅन्ट्री
प्रत्येक डब्यात : तीन शौचालय
एक रेकचा खर्च :१२० कोटी रुपये.
---------------
‘‘डब्याची कारबॉडी उपलब्ध झाली आहे. मार्च २६ मध्ये डब्याची निर्मिती होईल. जून २६ पर्यंत १६ डब्याचा पहिला रेक तयार होईल. त्यानंतर त्याची विविध स्तरावर चाचणी होईल. त्यांनतर पूर्ण क्षमतेने डब्याच्या उत्पादनाला सुरुवात होईल.
-अभिषेक मिश्रा, जनसंपर्क अधिकारी, लातूर मराठवाडा कोच फॅक्टरी.
फोटो ः 75362
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

