अतिरिक्त पाणी वापरासंबंधी महापालिकेला नोटीस
पुणे, ता. १० ः मंजूर असलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी वापर करणे तसेच पाणी पुरवठ्यासंबंधीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे सांगत महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने महापालिकेला पुन्हा एकदा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. महापालिकेस यापूर्वीही प्राधिकरणाने वारंवार सूचना देऊनही महापालिकेकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे प्राधिकरणाने पाठविलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे.
पुणे शहराला आवश्यक पाणी पुरवठा खडकवासला व भामा आसखेड या धरणातून केला जातो. दरम्यान, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून पुणे शहरासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणी पुरवठ्याचा कोटा मंजूर केला होता. त्यानुसार, पुणे शहराला दररोज ६३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरता येईल. दरम्यान, खडकवासला कालवा सल्लागार समितीची ऑक्टोबर २०१८ मध्ये बैठक झाली. या बैठकीत वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) इतके पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, सध्या पुणे महापालिका प्रशासन १३५० एमएलडी इतके पाणी घेत आहे.
प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धराने यांनी याबाबत नोटीस बजावली असून, स्पष्टीकरण व प्रतिज्ञापत्र एक महिन्यात सादर करण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत. प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.
‘पाणी पुरवठ्यासाठी २०११ ची जनगणना विचारात घेतली आहे. प्रत्यक्षात शहराची लोकसंख्या जास्त आहे. शहराची हद्द वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. प्राधिकरणाने पाठविलेल्या नोटिशीला अभ्यास करून उत्तर दिले जाईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

