‘पुणे लिट फेस्ट’ची पर्वणी १६ डिसेंबरपासून
आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते ‘पुणे लिट फेस्ट’चे उद्‌घाटन

‘पुणे लिट फेस्ट’ची पर्वणी १६ डिसेंबरपासून आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते ‘पुणे लिट फेस्ट’चे उद्‌घाटन

Published on

पुणे, ता. ११ : पुणे पुस्तक महोत्सवात यंदा सहा दिवसीय ‘पुणे लिट फेस्ट’चे आयोजन केले आहे. या ‘लिट फेस्ट’चे उद्‌घाटन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये येत्या मंगळवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता होणार आहे. या लिट फेस्टमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून ४० हून अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत ‘पुणे लिट फेस्ट’चे आयोजन केले आहे. याबाबत महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, विश्व संवाद केंद्राचे अभय कुलकर्णी, योगेश बोराटे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. ‘लिट फेस्ट’ला सांस्कृतिक मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, समर्थ युवा फाउंडेशन, पुणे महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात १६ ते २१ डिसेंबर दरम्यान लिट फेस्ट होणार आहे. यात विविध विषयांवरील मुलाखती आणि चर्चा रंगणार आहेत. या फेस्टमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ‘बुकर’ पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक, ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री गिरिजा ओक आदी मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळेल, असे पांडे यांनी सांगितले.
.........
*हे साधणार संवाद*
शरणकुमार लिंबाळे, डॉ. वसंत शिंदे, जयंत उमराणीकर, अविनाश धर्माधिकारी, अश्विनी भिडे, अभिराम भडकमकर, शेफाली वैद्य, वंदना बोकील-कुलकर्णी, विराजस कुलकर्णी
......
*हिंदी-इंग्रजी साहित्यविषयक सत्रांत सहभागी होणारे मान्यवर*
- रिकी केज, सिद्धार्थ काक, मुर्झबान श्रॉफ, श्रिया पिळगावकर, आमी गनत्रा, सिमिन पटेल, मिली अश्वर्या, अक्षत गुप्ता, आचार्य प्रशांत, बी. एस. नागेश, शाहीद सिद्दिकी, शम्स ताहिर, अजय बिसरिया, रुची घनश्याम
.....
*ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला संवाद साधणार*
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘गगनयान’ कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट दिली. ही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली. शुक्ला हे अंतराळात जाणाऱ्या राकेश शर्मांनंतरचे दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी २१ डिसेंबरला सकाळी अकराला नागरिकांना मिळणार आहे.
फोटो ः 75644, 75645, 75647

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com