पुणेकरांनी ‘चॉईस नंबर’साठी मोजले ७१ कोटी
अकरा महिन्यात १८ कोटींनी महसूल वाढला ः ४८ हजार वाहनांना चॉईस क्रमांक

पुणेकरांनी ‘चॉईस नंबर’साठी मोजले ७१ कोटी अकरा महिन्यात १८ कोटींनी महसूल वाढला ः ४८ हजार वाहनांना चॉईस क्रमांक

Published on

-------------
पुणे, ता. ११ ः पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आपल्या वाहनाला आवडता क्रमांक मिळावा म्हणून पुणेकरांनी शासनाने ठरविलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम देऊन आपला आवडता क्रमांक घेतला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २५ दरम्यान तब्बल ४८ हजार ३०३ वाहनधारकांनी ‘चॉईस क्रमांक’ घेतला असून त्यासाठी त्यांनी ७१ कोटींहून अधिक रक्कम मोजली आहे. या कालावधीत चारचाकीच्या ‘७’ क्रमाकांसाठी सर्वाधिक किमतीची बोली लागली होती. ‘७’ या क्रमांकाचे शुल्क ७० हजार रुपये असताना हौसेसाठी एका वाहनधारकाने ‘७ ’ या क्रमांकासाठी तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये मोजले. ही आता पर्यंतची सर्वात जास्त बोली ठरली आहे.
वाहनासाठी विशिष्ट ‘चॉईस नंबर’ किंवा ‘व्हीआयपी नंबर’ मिळविण्याची क्रेझ पुणेकरांमध्ये किती आहे, हे या आकड्यांकडे पाहून कळते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीवरून जानेवारी ते नोव्हेंबर २५ या ११ महिन्यांच्या कालावधीत पुणे आरटीओने केवळ चॉईस क्रमांकांच्या माध्यमातून ७१ कोटी ५३ लाख ४० हजार ९५१ रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत वाहने कमी असतानाही, ‘आरटीओ’च्या महसुलात तब्बल १८ कोटींहून अधिक रुपयांची भरघोस वाढ झाली आहे.
---------------
वाढलेला महसूल
------------------
- चालू वर्षातील उत्पन्न (जानेवारी ते नोव्हेंबर २०२५): ७१.५३ कोटी रुपये)
- मागील वर्षातील उत्पन्न (जानेवारी ते नोव्हेंबर २०२४) ः ५२.८७ कोटी रुपये
‘आरटीओ’च्या महसुलात मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १८ कोटी ६५ लाख रुपयांची वाढ
- चारचाकीच्या १ क्रमाकांसाठी ३ लाख रुपये शुल्क आहे.
‘१’ क्रमांकांची विक्री ३ लाख रुपयालाच झाली.
- ‘७’ क्रमांक मिळविण्यासाठी मात्र ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये मोजावे लागले.
-------------------
वाहन संख्येत घट, मात्र महसुलात वाढ :
तपशील जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ जानेवारी ते नोव्हेंबर २०२४
वाहनांची संख्या ४८,३०३ ४८,७९८
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ४९५ वाहनांची संख्या घटली आहे. ज्यांनी चॉईस क्रमांक घेतलेले नाही. तरी देखील महसूल वाढला आहे.
-----------------
‘‘जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान चॉईस क्रमांकाच्या विक्रीतून ‘आरटीओ’ला ७१ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला. ७, ९ या क्रमांकाला पुण्यात सर्वात जास्त मागणी आहे. यंदाच्या वर्षी ‘७ ’ क्रमाकांसाठी सर्वात जास्त बोली लागली होती.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com