मुलींना फूस लावून पळविणाऱ्या
दोघांना राजस्थानमधून अटक

मुलींना फूस लावून पळविणाऱ्या दोघांना राजस्थानमधून अटक

Published on

पुणे, ता. ११ : शहरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. गुन्हे शाखा आणि काळेपडळ पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपींचा शोध घेत दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणात दोघा आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१) आणि सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१, दोघेही रा. राणी, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि हालचालींचा मागोवा घेत तपास पथक गुजरात आणि राजस्थानपर्यंत पोहोचले. पोलिस पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात), तसेच फालना, शिवगंज, वाकली, अंदूर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली आणि जोधपूर (राजस्थान) असा सुमारे साडेतीन हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करत शोधमोहीम राबवली. अखेर एक मुलगी राजस्थानमधील राणी तालुक्यात आणि दुसरी मुलगी पाली जिल्ह्यात सापडली.

ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक अजय हंचाटे, पोलिस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे, तसेच गुन्हे शाखा युनिट-५ चे शशिकांत नाळे आणि गणेश माने यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com