अवती भवती
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे
प्रा. अडसुळे यांचा गौरव
पुणे, ता. १४ : सध्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी घरातील अन्नपदार्थापेक्षा बाहेरील पॅक फूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसत आहेत. यामुळे फार कमी वेळातच या विद्यार्थ्यांना मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग यांसारखे दुर्धर आजार होताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जंक फूडच्या दुष्परिणामांवर व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत समाजात जनजागृती करणाऱ्या प्रा. सुनीत अडसुळे यांच्या कार्याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी त्यांना नुकतेच सन्मानित केले. त्यांनी २५४ व्याख्यानाच्या माध्यमातून ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. प्रा. अडसुळे हे मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
जॉब फेअरमधून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत) आणि आयसीए एज्यु स्किल्स यांच्या वतीने जॉब फेअरचे आयोजन केले होते. यामध्ये प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक कंपन्यांचा समावेश होता. फेअरला ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. यापैकी १०० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड झाली. यासोबतच विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिपही देण्यात आल्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगानुभवासोबत आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरिल यांच्या हस्ते झाले. यावेळी अरिंदम चॅटर्जी, विनोद महाले, दीप्ती वेदांत आणि दिबादित्य घोष उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

