ओप्टीवीस, वेलोट्रीज, ट्रेलब्रेजर्सची बाजी ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह
पुणे, ता. १३ ः राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन–२०२५ (एसआयएच–२०२५) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीत ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी नावीन्यपूर्ण कल्पनांसह विजेतेपद पटकावले. तर इनो-कोर (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), क्लच एसआयएच (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), नेफ्रॉन आणि आरोग्य शिल्ड (दोन्ही केरळ सरकारच्या आरोग्य विभागाचे) यांनी आपापल्या गटात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला. शहरातील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्यातर्फे या हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव निवडलेले नोडल केंद्र होते. यामध्ये देशभरातून आंध्र प्रदेश, बिहार, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू–काश्मीर, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांतील एकूण २५ संघांची निवड झाली होती. या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी एआयसीटीई, रक्षा मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तसेच केरळ सरकारच्या आरोग्य विभागासमोरील विविध समस्यांवर पर्यायी उपाय सुचवले. अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघांच्या नवकल्पनांचे परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून करंडक, प्रमाणपत्रे व प्रत्येकी दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. राघवप्रसाद दास, ‘एआयसीटीई’चे सहाय्यक संचालक डॉ. राकेश कुमार गंजू, आयआयटीमुंबईचे माजी प्राध्यापक डॉ. नरेंद्र शहा, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एसआयच सेंटर प्रमुख गणेश भिसे, नोडल केंद्र प्रमुख डॉ. निशांत टिकेकर, स्पर्धा संयोजक प्रा. सुरेश कापरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कापरे यांनी केले, डॉ. टिकेकर यांनी आभार मानले. प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल
एआयसीटीई ः ओप्टीवीस (चंदीगड विद्यापीठ, पंजाब)
रक्षा मंत्रालय ः वेलोट्रीज (एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय ः द ट्रेलब्रेजर्स (मेप्को श्लेंक अभियांत्रिकी महाविद्यालय, तमिळनाडू)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय ः इनो-कोर (केजीआयएसएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोईंम्बतूर)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय ः क्लच एसआयएच (दयानंद सागर अभियांत्रिकी महाविद्यालय, बंगळुरू)
केरळ सरकारचा आरोग्य विभाग ः नेफ्रॉन (बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तर प्रदेश)
केरळ सरकारचा आरोग्य विभाग ः आरोग्यशिल्ड (एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे)
--------------
फोटो ः 76093
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

