जुन्नर वन विभागामध्ये ६८ बिबटे अडकले पिंजऱ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे, ता. १३ ः जुन्नर वनविभागात पिंजऱ्याच्या मदतीने आतापर्यंत ६८ बिबटे वनविभागाने पकडले आहेत. वनविभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्यासाठी सौर ऊर्जा कुंपण हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. वाढलेला बिबट्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने तेरा कोटी रुपये दिले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
प्राथमिक बचाव पथकात ४०० सदस्य कार्यरत आहेत. अतिसंवेदनशील गावांत चोवीस तास जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, कोरेगाव भीमा, आळे, नगदवाडी आणि गावडेवाडी या ठिकाणी बिबट कृती दल बेस कॅम्प केले आहेत. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ४१० सौर दिवे आणि टेंट वाटप करण्यात आले आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपण हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, आतापर्यंत १५० घरांना सौर ऊर्जा कुंपण बसविण्यात आले असून, आणखी ५५० घरांना सदर कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. विभागात एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित आहेत. वनविभागामार्फत ४०० आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना तीन हजार ३०० नेक गार्डचे वाटप, पाच ठिकाणी अनायडर्स मशिन कार्यान्वित असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

