लयबद्ध पदन्यास अन् भावोत्कट अभिनय नजाकतपूर्ण नृत्याविष्काराने फिटले डोळ्यांचे पारणे
पुणे ः मेघरंजनी मेधी यांच्या लयबद्ध पदन्यास आणि भावोत्कट अभिनयाने सजलेल्या नजाकतपूर्ण कथक नृत्याविष्काराने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लखनौ घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या लालित्याचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्याविष्काराने ‘सवाई’च्या चौथ्या दिवसाची समर्पक सांगता केली.
मेधी यांनी माता भगवती स्तुतीने प्रस्तुतीची सुरवात केली. लखनौ घराण्याचे वैशिष्ट्य असलेली नजाकत त्यांनी आपल्या सादरीकरणातून दर्शवली. तबला, पखवाज आणि सारंगीच्या साथीने त्रितालात परण, उठान, आमद अशी पारंपरिक पेशकश केली. लयबद्ध पदन्यासाने त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ४५ चक्करचे परण सादर केल्यावर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कृष्णलीलेचा प्रसंग सादर करताना त्यांच्या भावोत्कट अभिनयाचा प्रत्यय आला.
त्यांना गायनाची व लेहरा साथ पं. जॉयप्रकाश मेधी, पढंतची साथ मरामी मेधी, तबल्यावर अमान अली खाँ, सारंगीवर उस्ताद फारूक लतिफ खाँ आणि पखवाजवर पार्थ भूमकर यांनी साथसंगत केली.
----
‘इंडिगोच्या कृपेने आज पोहोचलो’
या सादरीकरणासाठी मी व माझे सर्व साथसंगतकार कालच पुण्यात येणार होतो. पण ‘इंडिगो’च्या कृपेने आज सकाळी पुण्यात पोहोचलो, अशी मिस्कील टिप्पणी मेघरंजनी मेधी यांनी केली. ‘एक दिवस उशिरा का होईना, सादरीकरणासाठी पोहोचू शकलो, हे अधिक महत्त्वाचे’, असेही त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

