पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे, ता. १६ : पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा १९, २० व २१ डिसेंबरला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, उपकरणांची माहिती तसेच शासन नियमाबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरला शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योगाची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
युट्युबर होण्यासाठी
प्रमाणपत्र प्रशिक्षण
‘बिकम अ सर्टिफाईड युट्युबर’ ही चार दिवसांची कार्यशाळा २७ व २८ डिसेंबर तसेच ३ व ४ जानेवारीला आयोजिली आहे. ज्यांना युट्यूब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर आणि एआयचा उपयोग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. युट्युबद्वारे कमाई, चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथांचे लेखन कसे करावे, कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगला कंटेंट कसा तयार करता येईल याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. सोबतच युट्युब विश्लेषण, लघुपट निर्मिती, निर्मितीपूर्व कामे, निर्मितीनंतरची कामे, मार्केटिंग, एसईओ व अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचे विविध तांत्रिक मार्ग, हक्क आणि कायदेशीर बाबी आदींबद्दलही मार्गदर्शन होणार आहे.
प्रात्यक्षिकासह शिका
फरसाण व स्नॅक्स
स्वादिष्ट व चमचमीत असे २० विविध प्रकारचे व्यावसायिक फरसाण व स्नॅक्स प्रात्यक्षिकासह शिकवणारे प्रशिक्षण २७ व २८ डिसेंबरला होणार आहे. प्रशिक्षणामध्ये फरसाण तयार करण्याची व्यावसायिक पद्धत व त्या अनुषंगाने त्याला लागणारे विविध प्रकारचे ड्राय स्नॅक्सचे प्रकार शिकवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या व्यवसायाचे स्वरूप, कॉस्टिंग, ब्रॅण्डिंग, पॅकिंग, लेबलिंग, विविध प्रकारचे प्रिझर्वेशन, लायसनिंग कॉस्ट, प्रॉडक्शन कॉस्ट अशी सर्व प्रकारची व्यावसायिक माहिती दिली जाणार आहे. व्यवसायासाठी लागणारी मशिनरी, कॉस्टिंग, प्रकल्प अहवाल, शासकीय योजना आदींबाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणात व्यावसायिक फरसाण, शेव, पापडी, गाठीया, खरी बुंदी, पुदिना शेव, लसूण शेव, पालक शेव, मका चिवडा, शाबू चिवडा, बटाटा चिवडा, डाएट चिवडा, ड्राय सामोसा, ड्राय कचोरी, चिलीमिली, सोया स्टीक्स, स्टीक चकली, बटर चकली, पालक चकली, दालमोठ इत्यादी पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकता येतील.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

