दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची संधी

दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची संधी

Published on

पुणे, ता. १६ : इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्सतर्फे शुक्रवार (ता. १९) ते रविवार (ता. २१) दरम्यान ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ या दुर्मीळ नाण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात सर्वांसाठी प्रदर्शन खुले असणार आहे, अशी माहिती ‘आयसीएसआरआय’चे पुणे शहर सचिव शरद बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी उपाध्यक्ष कमलेश मोतीवाला, सहसचिव श्याम मोठे, खजिनदार नितीन शहा, राजेंद्र शाह उपस्थित होते. या प्रदर्शनाद्वारे नागरिकांना दुर्मीळ नाणी, नोटा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होन आणि विविध दुर्मीळ नाण्यांचा खजिना आणि विदेशी फॅन्सी नाणी बघायला मिळणार आहेत. प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता नाणकशास्त्रतज्ज्ञ डॉ. के. के. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे, तसेच फारुख एस. तोडीवाला, डॉ. दिलीप राजगोर आणि पोपट हलपावत यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
------

Marathi News Esakal
www.esakal.com