विद्येचे प्रांगण वार्षिक क्रीडादिन उत्साहात
मुक्तांगण इंग्लीश स्कूल
पुणे, ता. १७ : मुक्तांगण इंग्लिश स्कूल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे वार्षिक क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू मनोज एरंडे तसेच पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, संचालक आनंद कुलकर्णी, प्राचार्या सुप्रिया देशकुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका जयंती नरवणे, विजया काळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती निकम आदी उपस्थित होते. शिक्षिका डॉ. मनीषा कोतवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. स्वरा पवार आणि अर्पिता खाडे या विद्यार्थिनींनी ‘लाठी काठी’ या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसह, शाळेत घेण्यात आलेल्या विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट क्रीडा स्पर्धेचा चषक विवेकानंद कुलाच्या विद्यार्थ्यांना मिळाला. क्रीडा शिक्षक उमेश देशपांडे, अनिता गायगोळे आणि हर्षद मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत क्रीडा उपक्रम घेण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
.......
म. ए. सो. मुलांचे विद्यालय
पुणे, ता. १७ : म. ए. सो. मुलांचे विद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. प्रशालेच्या मैदानावर घोष पथकाच्या गजरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर व भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच शालेय पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी प्रास्ताविक केले.शाला समितीचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विविध खेळ प्रकारात विजयी, उपविजयी व वैयक्तिक खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या खेडाळूंना पदक, ढाल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मएसोचे क्रीडावर्धिनीचे समन्वयक शैलेश आपटे, उपमुख्याध्यापिका मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका रसिका लिमये, क्रीडा शिक्षक प्रतिनिधी भाऊसाहेब खुणे आदी उपस्थित होते. माया कुलकर्णी, अमृता अराणके व स्वाती हावळे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब खुणे यांनी आभार मानले.
श्री भेकराईमाता विद्यालय
पुणे, ता. १७ : श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयातील नक्षत्रा पाटणकर हिने फ्लाइंग ऑफिसर परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे, उपमुख्याध्यापक सुनील दीक्षित, पर्यवेक्षक यास्मीन इनामदार, मारुती खेडकर यांच्या हस्ते नक्षत्राला आणि तिच्या आई-वडिलांना गौरविण्यात आले. अपर्णा बिरदवडे यांनी सूत्रसंचालन केले.
................
फोटो ः 77366, 77369
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

