टोल न भरल्याने प्रवासी तासभर अडकले
‘शिवनेरी’तील प्रकार ः अखेर वर्गणी जमा करून टोल भरला

टोल न भरल्याने प्रवासी तासभर अडकले ‘शिवनेरी’तील प्रकार ः अखेर वर्गणी जमा करून टोल भरला

Published on

पुणे, ता. १७ ः ‘फास्टटॅग’मध्ये रक्कम नसल्याने तळेगाव टोलनाक्यावर शिवनेरी बस थांबवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एका गर्भवतीसह सर्व प्रवाशांना सुमारे तासभर मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर प्रवाशांवर वर्गणी जमा करून टोल भरण्याची वेळ आली. त्यानंतरच बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
या संदर्भात बसमधील प्रवाशांनी बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील दादर येथून बुधवारी सायंकाळी पाच वाजता निघालेली ई-शिवनेरी बस (क्र. एमएच १२ व्हीएफ ५२०७) पुण्याकडे निघाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्यावर पोचली. मात्र, बसच्या फास्टटॅगमध्ये रक्कम नसल्याने टोल वसूल होऊ शकला नाही. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलची रक्कम भरल्याशिवाय बस पुढे जाऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांना सुमारे तासभर बसमध्येच ताटकळत बसावे लागले. बस चालकाने डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर संतप्त प्रवाशांनी वर्गणी गोळा करून, सुमारे १४०० रुपयांचा टोल रोख स्वरूपात दंडासह भरला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. प्रवाशांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘‘फास्टटॅगमध्ये पैसे नसणे ही गंभीर बाब आहे. प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात. अशा परिस्थितीत जबाबदारी कोणाची? डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही फोन उचलला नाही. संबंधितांवर कडक कारवाई करावी. या प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झाला असून, ग्राहक मंचात तक्रार करणार आहे.
- सायली बारटक्के, महिला प्रवासी, पुणे.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com