टोल माफ असूनही प्रवाशांची अडवणूक तळेगाव टोलनाक्यावर ई शिवनेरी बसबाबत संतापजनक प्रकार
पुणे, ता. १८ ः महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत ई बसला पूर्ण टोल माफ असताना दादरहून पुण्याला येणाऱ्या ई शिवनेरी बसला थांबविण्यात आले. एसटी चालकाकडून ९०० रुपयांचा टोल घेतल्याशिवाय बसला मार्गस्थ होऊ दिले नाही. तळेगाव टोलनाक्यावर हा संतापजनक प्रकार घडला.
दादरहून बुधवारी सायंकाळी पाच वाजता ई-शिवनेरी बस (क्र. एमएच १२ व्हीएफ ५२०७) ठाणे मार्गे पुण्याकडे निघाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्यावर पोचली. मात्र बसच्या फास्टटॅगमध्ये रक्कम नसल्याने टोल वसूल होऊ शकला नाही. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलची रक्कम भरल्याशिवाय बस पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांना सुमारे तासभर बसमध्येच ताटकळत बसावे लागल्याची घटना घडली. मुळात ई वाहनांना अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे व समृद्धी महामार्ग या मार्गावर टोल माफी आहे. असे असताना तळेगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने बसची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
------
एसटी चालकाने संपर्क साधला नाही
ई शिवनेरी बस ही परळ आगाराची होती. तळेगाव टोल नाक्यावर असा प्रकार घडत असताना चालकाने याची कल्पना वरिष्ठांना दिली असती, तर हा प्रकार घडला नसता. एसटीच्या पुणे विभागाला देखील याची कोणतीही माहिती संबंधित एसटी चालकाने दिली नसल्याचे पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
----------
‘‘ई शिवनेरीला राज्य सरकारने टोलमधून सूट दिली आहे. असे असताना टोलनाक्यावर असा प्रसंग घडणे हे चिंताजनक आहे. फास्टटॅगसाठी एसटीच्या खात्यातील रक्कम ही लाखांमध्ये असते. टोल नाक्यावर प्रवाशांची केलेली अडवणूक ही संतापजनक आहे.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

