अमली पदार्थ प्रकरणी 
विशाल मोरे ताब्यात

अमली पदार्थ प्रकरणी विशाल मोरे ताब्यात

Published on

पुणे, ता. १८ ः सावरी (जि. सातारा) येथे सापडलेल्या अमली पदार्थ साठ्याप्रकरणी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचा अध्यक्ष विशाल मोरे यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर पक्षाने मोरे याची तडकाफडकी हकालपट्टी केली.
अमली पदार्थ साठ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा संबंध असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी केला होता.
मेफेड्रोन प्रकरणामध्ये मोरे याचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी ३ डिसेंबर रोजी पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यामध्ये विशाल मोरे यास विद्यार्थी सेलचा अध्यक्ष केले होते. त्याचबरोबर त्याच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीही सोपवली होती.
पक्षाचे शहर समन्वयक राकेश कामठे यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रसिद्धिमाध्यमांना पाठविले. त्यामध्ये मोरे याच्यावर कारवाई केल्याचे पत्रामध्ये नमूद केले. मात्र, संबंधित पत्र हे पक्षाच्या लेटरहेडवर न देता साध्या कागदावर देण्यात आले.
-----------

Marathi News Esakal
www.esakal.com