रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांची फसवणूक

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांची फसवणूक
Published on

पुणे, ता. २३ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी याबाबत धनकवडी परिसरातील एका ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत श्यामलाल तलरेजा (वय ३५, सध्या रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर; मूळ रा. जालना) याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आरोपीशी २०१८ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर विविध कारणे सांगत आरोपीने महिलेकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात सहा लाख ९६ हजार रुपये घेतले. नोकरीबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपीने सहा वर्षांपासून टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने २२ डिसेंबर रोजी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com