पुणे
गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’चे प्रकाशन
पुणे, ता. २३ ः गजाला शेख लिखित आणि ‘रायटर्स पॉकेट’ प्रकाशित ‘द फिनिक्स पाथ’ या पुस्तकाचे प्रकाशन कॅम्पमधील द पूना क्लब येथे आयोजित कार्यक्रमात झाले. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उदयन पाठक, ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट, पार्थो सारथीदास आदी उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘गजालाच्या पुस्तकातून तिने कठीण प्रसंगांना तोंड देत सावरलेले आयुष्य मला समजले. तिला कोणाचाही पाठिंबा अथवा सहानुभूतीची अपेक्षा नाही. प्रत्येक प्रसंगात तिच्या आयुष्याची लढाई तिनेच लढली आहे आणि आजही लढत आहे. स्त्रीची ताकद काय असते हे तिच्या कथेतून वाचकांसमोर येईल.’’ जारा शेख हिने आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या. पुस्तक प्रकाशनानंतर गजाला शेख यांच्याशी अंशुमन आनंद यांनी संवाद साधला.

