डॉ. सुधीर जोशी लिखित ‘चलो एक बार फिर से’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सुधीर जोशी लिखित ‘चलो एक बार फिर से’ पुस्तकाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. २३ ः डॉ. सुधीर जोशी लिखित ‘चलो एक बार फिरसे’ या पुस्तकाचे प्रकाशन नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात झाले. याप्रसंगी लेखक डॉ. अनिल रोंधे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर, गायिका चारुशीला बेलसरे, उद्योजक विजकुमार मर्लेचा, प्रा. सुरेश भोसले आदी उपस्थित होते. ‘‘चित्रपटसृष्टीतील गायक, गायिका, संगीतकार, गीतकार यांच्या कारकिर्दीचा आलेख या पुस्तकात सुरेखपणे मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक माहितीपूर्ण झाले आहे’’, असे डॉ. अनिल रोंधे म्हणाले. पूजा मिजार यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा गोहाड यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com