पुणे
‘व्हिस्परिंग नेचर’ प्रदर्शन उद्यापासून
पुणे, ता. २३ ः निवृत्त न्यायाधीश किरण सातारकर यांच्या चित्रांच्या ‘व्हिस्परिंग नेचर’ या प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारपासून (ता. २५) करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शनिवारपर्यंत (ता. २७) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

