नवले महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती
पुणे, ता. २३ : एचआयव्ही- एड्सविषयी योग्य माहिती आणि प्रतिबंधाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अरविंद भोरे यांना वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बालसदन संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात जाधवर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एड्स प्रतिबंध या विषयावर पथनाट्य सादर केले. या वेळी मैत्री युवा फाउंडेशनचे संकेत देशपांडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वृषाली मुळे, उपअधिष्ठाता डॉ. परविंदरसिंग चावला, बालसदन संस्थेच्या संचालिका अश्विनी नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन वानखेडे यांनी केले.

