उमेदवारी अर्ज भरण्याकडे पाठ

उमेदवारी अर्ज भरण्याकडे पाठ

Published on

पुणे, ता. २३ : पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना आज पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातील एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. मात्र १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून दोन हजार ८८६ अर्जांची विक्री झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी २४ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी १ हजार १२६ ना हरकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जागा वाटप, उमेदवार निश्‍चित करण्यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडूनही नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. काही राजकीय पक्ष २६ डिसेंबरपासून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी सर्वच इच्छुकांनी निवडणूक कार्यालयातून अर्ज घेणे, तो वकिलांच्या मदतीने भरणे, आर्थिक विवरण सादर करणे, महापालिकेकडून थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे अशी तयारी सुरु केली आहे.
महापालिका प्रशासनाने आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यंत्रणा तयार करून ठेवली. पण दिवसभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. आम आदमी पक्षाने दोन याद्यांमधून ४१ उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी त्यांनी अर्ज भरलेले नाहीत. तसेच अपक्ष उमेदवारांचेही अर्ज आलेले नाहीत.

क्षेत्रीय कार्यालय आणि विक्री झालेले उमेदवारी अर्ज
येरवडा-कळस-धानोरी : १९५
नगररस्ता-वडगावशेरी : १९५
शिवाजीनगर-घोलेरस्ता : २७५
औंध-बाणेर : ७३
कोथरूड-बावधन : १९४
ढोले पाटील रस्ता : १७५
हडपसर-मुंढवा : १९९
वानवडी-रामटेकडी : १९९
बिबवेवाडी : २२१
भवानीपेठ : १९१
कसबा-विश्रामबाग : ३००
वारजे-कर्वेनगर : २२१
सिंहगड रस्ता : १९७
धनकवडी-सहकारनगर : २००
कोंढवा-येवलेवाडी : ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com