अवतीभवती

अवतीभवती

Published on

सीआरपीएफच्या ग्रुप केंद्रात वृक्षारोपण
पुणे : ‘‘प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणपूरक वृक्षलागवड करणे हे केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक कर्तव्यही आहे,’’ असे मत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) पोलिस उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफच्या ग्रुप केंद्रात श्री कल्पतरू संस्थेच्या पुढाकाराने व पद्मा प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचा समारोप नुकताच झाला. जागतिक पर्यावरणदिनापासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत परिसरात सुमारे ५ हजार स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यात आली असून, त्यांचे संगोपन करण्याचा संकल्पही घेण्यात आला. या उपक्रमात संस्थेचे प्रमुख विष्णू लांबा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोई, शिक्षणतज्ज्ञ डॉ. महेश थोरवे, उद्योजिका वृषाली गोसावी, मयूर पडलवार यांचा सहभाग होता.

दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, महिला कल्याण संघाच्या अध्यक्षा डॉ. वैशाली ठाकूर, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, डॉ. अ. ल. देशमुख, संस्कार वर्गप्रमुख विजय भालेराव, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, गुणांपेक्षा गुणवत्ता, दृष्टिकोन आणि संघर्षाची तयारी महत्त्वाची आहे. ही गुणवत्ता वाढविण्यासाठी जय गणेश पालकत्व योजना खऱ्या अर्थाने मुलांची जडणघडण करते.

शिवाजी मेमोरिअल शाळेत
शाहू महाराजांना अभिवादन
पुणे : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल शाळेच्या आवारात शाहू महाराज यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, काळूराम ससाणे, शशिकांत शेलार, प्रदीप गायकवाड, शशिकांत कांबळे, सीमा कांबळे, सविता कांबळे उपस्थित होते.

श्‍वेतांबर संघातर्फे स्नात्र पूजा
पुणे : चंदननगर येथील श्‍वेतांबर मूर्ती पूजक संघातर्फे जैन मंदिरात निर्माण कार्यानिमित्त स्नात्र पूजेचे आयोजन केले होते. स्नात्र पूजा जैन धर्मातील एक धार्मिक विधी आहे. ही पूजा तीर्थकांच्या जन्माचा ज्ञानप्राप्तीचा आणि मोक्षाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. यामध्ये दीपक पूजा, अक्षत पूजा, पुरुषोत्तम पूजा आधी विविध धार्मिक पूजा करण्यात आल्या. यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ. शांतिलाल बोरा, उपाध्यक्ष अभिजित शहा, सचिव परेश कटारिया, खजिनदार प्रवीण संघवी, किरण कुमार कटारिया, सूजल शहा, पार्श्‍व शहा, कुंदनमल परमार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com