राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न सहन करणार नाही : डॉ. चलवादी
पुणे, ता. ३० : ‘‘राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आलेले वक्तव्य हे राज्यघटनेच्या आत्म्यावर आघात करणारे आहे. राज्यघटनेत कुठल्याही प्रकारचा बदल करून त्याची दिशा आणि तत्त्व बदलण्याचा प्रयत्न बहुजन समाज सहन करणार नाही,’’ असा इशारा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकाद्वारे दिला.
घटना बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वैचारिक, सामाजिक आणि राजकीय लढ्यातून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली असल्याचे चलवादी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरक्षण, समानता, सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांचा पुरस्कर्ता हा आमचा संघर्ष असून, तो अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संविधान व बहुजन हितार्थ ठोस कार्यक्रम घेऊन बसप जनतेसमोर जाईल.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.