

विविध देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा ३० हून अधिक वर्षांपासून चलनात असून, कागदी चलनांच्या तुलनेत यांचे आयुष्य सुमारे दोन ते चार पट जास्त आहे. अर्थव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन आपली उत्पादन क्षमता वाढवणे हा दुसरा उद्देश आहे.
- संजय मल्होत्रा, गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक
--------------------------
प्रत्यक्ष वापरापूर्वी क्षेत्रीय चाचणी ः प्लास्टिक नोटा प्रत्यक्ष वापरात आणण्यापूर्वी त्यांचा टिकाऊपणा आणि भारतातील विविध हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमता तपासण्यासाठी त्यांची सखोल क्षेत्रीय चाचणी केली जाणार आहे. त्यातील निकालावर पुढील अंमलबजावणी ठरणार.
----------------------------------------
२०० कोटी
प्लास्टिक नोटांच्या छपाईला पहिल्या टप्प्यात केंद्राची मंजुरी
----
१०, २० रुपये
प्लास्टिकच्या नोटा पहिल्या टप्प्यात चलनात येतील.
----
२०२७-२८
पासून प्लास्टिक नोटांचा चलनात पुरवठा सुरू होण्याची शक्यता
--------------------------------------
डिजिटल व्यवहारातही ‘रोख’ अबाधित
देशात डिजिटल व्यवहार प्रचंड वाढूनही चलनातील रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. त्याला ‘कॅश-डिजिटल पॅराडॉक्स’ म्हटले जाते. सध्या भारतात ३५ लाख कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम चलनात आहे.
-----------------------
विश्वासार्ह चलन व्यवस्थेचा पाया
भारताची अर्थव्यवस्था ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करत असली तरी छोट्या रोख व्यवहारांची गरज अजूनही मोठी आहे. त्यामुळे प्लास्टिक नोटा हा पारंपारिक चलन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम ठरू शकतो. सहकारी बँका, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा बदल सुरक्षित, टिकाऊ आणि विश्वासार्ह चलन व्यवस्थेचा पाया ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.