पुणे
पोलिस पाटील पतसंस्था अध्यक्षपदी मानकर
पिरंगुट, ता. २७ : मुळशी तालुका पोलिस पाटील सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वातुंडे (ता. मुळशी) येथील पोलिस पाटील रामदास मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अकोले येथील सुनील सातपुते यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी म्हणून शुभम वारघडे यांनी काम पाहिले. पतसंस्थेचे १०२ सभासद असून भागभांडवल ३० लाख रुपये आहे. संस्थेने सभासदांना १० टक्के दराने लाभांश वाटप केल्याची माहिती सचिव नंदू मारणे यांनी दिली.
यावेळी सुरेश तिकोने, नितीन चोंधे, भरत ठोंबरे, नागेश मोरे, हनुमान मांडेकर, किरण शेळके, गणेश दळवी, निशिगंधा गुरव, स्वाती सुतार, संदेश हरगणे, दीपक मातेरे, चैतन्य वाकणकर, स्वाती गोळे, वर्षा शिंदे, उपस्थित होते.

