पिरंगुटला श्री शिवराय पुरस्कारांचे वितरण

पिरंगुटला श्री शिवराय पुरस्कारांचे वितरण

Published on

पिरंगुट, ता. २९ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शिवराय मित्र मंडळाच्यावतीने श्री शिवराय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंदार महाराज येनपुरे, बाळासाहेब सातव, सोमनाथ कळमकर, संतोष पाडाळे, अॅड. श्रद्धा भालेराव, राजश्री माझिरे, पप्पू कंधारे, कृष्णा यादगिरे, शरद गुंड, आश्‍विनी पवार, विनोद सुर्वे, प्रतीक्षा सुतार, आशा लांडगे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी घेतलेल्या शिबिरामध्ये २०३ दात्यांनी रक्तदान केले. तीनशे नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. ऋतुपर्ण शिंदे यांनी मधुमेह आजारावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, शांताराम इंगवले, ऋषिकेश चोरघे, धर्मराज हांडे उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी पिंपरी येथील सिरॅालॅाजिकल ब्लड बँकेच्या डॉक्टर्स आणि स्टाफने सहकार्य केले. राहुल पवळे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे, नीलेश पाडाळे, अक्षय सातपुते, गणेश मांडेकर, सचिन तापकीर, नवनाथ चरवड, सुभाष माझीरे, विजय मारणे, विजय सणस, मयूर मारणे आदींनी केले होते.

Marathi News Esakal
www.esakal.com