पुसेगावमध्ये आज उडणार धुरळा; काणी भिर्रर्रर्रर्र.... चा नाद घुमणार; कोण होणार मानाच्या हिंदकेसरी किताबाचा मानकरी? याकडे महाराष्ट्राच्या नजरा
पुसेगावात आज ‘भिर्रर्रर्रर्र’चा नाद घुमणार
बैलगाड्यांचा धुरळा उडणार; मानाच्या हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरणार
पुसेगाव, ता. १५ : येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित मानाची हिंदकेसरी बैलगाडी शर्यत उद्या (मंगळवारी) येथील दहिवडी मार्गावरच्या बैल बाजाराशेजारील मैदानात सकाळी सात वाजता सुरू होईल. यंदाची ही भव्य बैलगाडी शर्यत जास्तीत जास्त आधुनिक साधनांचा वापर करून पारदर्शकरीत्या पार पाडली जाईल, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी दिली.
शर्यतीमधील प्रथम १२ क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे दोन लाख ७८ रुपये, एक लाख ७१ हजार ७८ रुपये, एक लाख ५१ हजार ७८ रुपये, एक लाख २५ हजार ७८ रुपये, एक लाख ७८ रुपये, ७५ हजार ७८ रुपये, ५० हजार ७८ रुपये, ४० हजार ७८ रुपये, ३० हजार ७८ रुपये, २० हजार ७८, १५ हजार ७८ रुपये, ११ हजार ७८ रुपये बक्षीस दिले जाईल. एक ते बारा क्रमांकांच्या विजेत्या बैलगाड्यांना प्रत्येकी दोन ढाली देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येक उपांत्य फेरीत दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह दिले जाईल. गट विजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सन्मानचिन्ह दिले जाईल. प्रथम क्रमांकाच्या गाडीच्या ड्रायव्हरला ''श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर'' या किताबाने सन्मानित केले जाईल.
या शर्यतीसाठी मैदानाची आदर्शवत रूपरेषा तयार केली आहे. मैदानात उत्कृष्ट धावपट्ट्या, बॅरिगेड्स, प्रेक्षक गॅलरी, ड्रोन कॅमेरे, लाइव्ह कॅमेरे, मोठ्या स्क्रीन, लाइव्ह प्रक्षेपण जनावरांसाठी चारा-पाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, तसेच आरोग्यविषयक आणि आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची सोय केली आहे.
पुसेगावमधील श्री सेवागिरी महाराज यात्रेतील बैलगाडी शर्यत देशातील मोठ्या शर्यतींपैकी एक मानली जाते. यामध्ये यशस्वी ठरलेल्या बैलांची किंमत लाखोंच्या घरात होते. त्याचा आर्थिक फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असतो. त्यामुळे बहुतांश बैलमालक बक्षिसाच्या रकमेला महत्त्व न देता पुसेगावच्या मैदानात आपला बैल पळविण्यासाठी आग्रही असतात. या मैदानात एक किंवा दोन फेऱ्या जिंकणारे बैलसुद्धा नावारूपाला येतात. त्यामुळे या शर्यतीची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
दरम्यान, यंदाचे पुसेगावचे मैदान आदर्शवत होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव विशेष परिश्रम घेत आहेत.
.....................................
शर्यतीसाठी १००१ गाड्यांची विक्रमी नोंद झाली आहे. गटाच्या चिठ्या सर्वांसमक्ष ऑन कॅमेरा (युट्यूब लाइव्ह) पेटीतून काढून पारदर्शक लॉट्स पाडले आहेत. संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला हेवा वाटेल, असे डोळ्याचे पारणे फेडणारे ''श्री सेवागिरी हिंदकेसरी'' मैदान पार पडेल.
- संतोष वाघ,
अध्यक्ष, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट.
.....................................
फोटो :.......01258
पुसेगाव : ट्रस्टने बैलांना पळण्यासाठी आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी तयार केलेले आकर्षक मैदान. (ऋषिकेश पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

