शिवसेना

शिवसेना

Published on

सोलापूर शिवसेना (उबाठा) पक्षात ''लेटरबॉम्ब''!
अजय दासरींची जबाबदारी बदलण्याची खैरेंची मागणी; पत्र व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत धुसफूस थांबण्याऐवजी आता अधिकच चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांची जबाबदारी बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
​काही दिवसांपूर्वी सोलापुरात आलेल्या चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांसमोर पक्षात कोणताही वाद नसून ''सर्व काही अलबेल'' असल्याचा दावा केला होता. मात्र, आता समाज माध्यमात व्हायरल झालेल्या पत्रानुसार, खैरे हेदेखील दासरी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या आहेत माजी खासदार खैरे यांच्या मागण्या
​जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याकडे सध्या असलेली शहर उत्तर व शहर मध्य या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी काढून घेण्यात यावी. ​त्याऐवजी दासरी यांना बार्शी, मोहोळ, मंगळवेढा या ग्रामीण तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात यावी. ​दासरी यांच्याकडून काढून घेऊन शहर मध्य व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दुसरे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्याकडे देण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.

पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
​खैरे यांच्या या पत्राने सोलापूर शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आणखी उघड झाला आहे. शहर मतदारसंघांची जबाबदारी काढून ग्रामीण भागाची जबाबदारी देण्याची मागणी म्हणजे एक प्रकारे विद्यमान जिल्हाप्रमुखांचे डिमोशन करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
--------
कोट
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणीतरी केलेला हा खोडसाळपणा आहे. पत्राबाबत मला काहीही माहिती नाही. परंतु लोकांचा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अशा गोष्टी घडविल्या जात आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो मला मान्य असेल. कुठल्याही मतदार संघाची जबाबदारी दिल्यास मी ती निश्चितपणे पार पडेल. यंदा महापालिकेवर भगवा फडकेल, या भीतीनेच विरोधकांचे हे कटकारस्थान आहे.
- प्रा. अजय दासरी, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com