सोलापुरात हापूस दाखल पेटीला मिळाला १ हजार रुपयांचा दर , डाळिंबाला मिळतोय प्रति किलो १७० रुपयांचा कमाल दर ’पेरूच्या दरात ही सुधारणा ’

सोलापुरात हापूस दाखल पेटीला मिळाला १ हजार रुपयांचा दर , डाळिंबाला मिळतोय प्रति किलो १७० रुपयांचा कमाल दर ’पेरूच्या दरात ही सुधारणा ’

Published on

(पालेभाज्या, फळभाज्यांचे फोटो टाकावेत)

सोलापुरात हापूस दाखल, पेटीला मिळाला हजार रुपयांचा दर

डाळिंबाला प्रति किलो १७० रुपयांचा कमाल दर; पेरूच्या दरातही सुधारणा

उ. सोलापूर, ता. २७ : ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. या पेटीला प्रति पेटी एक हजार रुपयांचा दर मिळाला. बाजारात सध्या डाळिंबालाही चांगला दर मिळत असून कमाल दर हा प्रति किलो १७० रुपये पर्यंत आहे. भाजीपाला विभागात मात्र पालेभाज्यांचे दर तळाला आहेत कोथिंबीर घाऊक बाजारात सरासरी चार रुपये पेंढी दराने विक्री होत आहे. फळभाज्यांनाही दर घसरणीचा फटका बसला असून घेवडा प्रति किलो २० ते ३० रुपये दराने विकत आहे.
चालू आठवड्यात सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात डाळिंबांना चांगली मागणी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. पालेभाज्याच्या विभागात मात्र दर घसरण सुरूच आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे दर तळाला आहेत. गत आठवड्याच्या तुलनेने या आठवड्यात पालेभाज्यांच्या दरात प्रति शेकडा २००ते ३००रुपयांची घट झाली आहे. फळभाज्यांमध्येही घेवडा, गवार, दोडका यांचे दर कमी आहेत. वांगी व ढोबळी मिरचीच्या दारात मात्र मोठी घट झाली आहे. लिंबूच्या दरात ही मोठी घसरण झाली असून लिंबू सरासरी १२० रुपये प्रति दहा किलो दराने विक्री होत आहे. फळ बाजारात फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. डाळिंबाच्या दरात थोडीशी घट झाली आहे तर पेरूच्या दरात प्रति दहा किलो १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली आहे. भुसार बाजारात सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाली असून दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेले आहेत.


शेकडा पालेभाज्यांचे दर सरासरी व कमाल

कोथिंबीर ४००-५००
मेथी ४००-५००
राजगिरा ३००-४००
शेपू ५००-६००
पालक २५०–३००
तांदूळसा ४००-५००
अंबाडी ४००-५००


फळभाज्यांचे प्रति दहा किलो सरासरी व कमाल दर
बीट १२०-१५०
कारले २५०-६००
वांगी १५०–३००
कोबी ११०-१२०
ढोबळी मिरची १३०–२५०
गाजर २००-३००
गवार ७००-९००
काकडी -२००-५००
घेवडा १५०-२००
हिरवी मिरची २५०-३६०
कांदा पात ४००-५००
भेंडी ३००-६००
लिंबू १००-१७०
दोडका २००-३८०
टोमॅटो १८०-३७०
बटाटा १००-१३०


फळांचे प्रति दहा किलो दर
सफरचंद ९००-१३००
बोर ३५०-४७०
चिकू ३००-४००
सिताफळ २५०-६००
पेरू ३००-५००
टरबूज १५०-२२०
मोसंबी २२०-३००
पपई ७०-१००
अननस ३००-४००
डाळिंब ९००-१७००
द्राक्ष ९००-१०००


शनिवारची कांदा बाजाराची स्थिती

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी ४६१ ट्रक कांद्याची आवक झाली, गत शनिवारी हीच आवक२१५ ट्रक होती. काल बाजारात कांद्याचा कमाल दर ३३००प्रति क्विंटल इतका राहिला तर सरासरी दर १३०० इतका राहिला.

भुसार बाजार , प्रतिक्विंटल दर
सोयाबीन ४६८५ - ४७५०
मका १९००
गुळ ४१०० - ४४१०

चौकट
तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १०० ते ५०० रुपयांची सुधारणा
चालू आठवड्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे. तुरीचे दर गत आठवड्याच्या तुलनेने ६०० रुपयांनी वाढले आहेत. शनिवारी बाजारात तूर ६५०० ते ७२८० रुपये प्रति क्विंटल दराने विकली गेली.


अंडी बाजार गरम
वाढलेल्या थंडीमुळे अंड्याची बाजारातील मागणी वाढली असून घाऊक बाजारात अंड्याचा दर प्रति शेकडा ७०० रुपयांच्या वर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com