पुरंदर उपसा सिंचनमुळे शेती उत्पादनात वाढ
सासवड, ता. ३१ : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, योग्य नियोजन करून आणि कोणतेही राजकारण न आणता पुरंदर उपसा जलसिंचन योजना कार्यक्षमतेने चालविली. त्यामुळे २०१९ पर्यंत उसाचे ५० हजार टन असणारे उत्पादन आता ७ लाख २५ हजार टनांवर गेले आहे. याबरोबरच फळबागा, फुलशेती आणि भाजीपाला उत्पादनात मोठी वाढ झाल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.
अटल भूजल आणि पुरंदर योजनेसाठी मंजूर ४८ कोटींच्या निधीतून उर्वरित जलवाहिनीची कामे, सौर ऊर्जेची जोड यामुळे लाभक्षेत्रातील सर्व शेतजमीन ओलिताखाली आणणार आहे. तालुक्यातील शेतकरी कष्टाळू असून, सीताफळ इस्टेट, अंजीर जीआय टॅगींग, सहकारी साखर कारखाना, शेतमालावर प्रक्रीया उद्योगांमुळे शेतकरी समृद्ध होणार असल्याचा विश्वास आमदार संजय जगताप यांनी व्यक्त करत आणखी चांगले काम करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
सोनोरी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. ३१) महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार जगताप यांनी जगताप आंबोडी, वनपुरी, पूर्व पुरंदर, तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदरच्या दक्षिण भागात दौरे केले. याप्रसंगी झालेल्या बैठकीत आमदार जगताप बोलत होते.
आमदार जगताप म्हणाले, ‘‘सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून सोनोरी आणि पुरंदर तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे येथे विविध फळबागा, फुलशेती भाजीपाल्याचे उत्पादन वाढून कृषी क्रांती घडली आहे. याप्रमाणे पुरंदर उपसा, जनाई, गुंजवणी योजनांचा लाभ, २०२० नंतर अस्तरीकरणाच्या अनुदानातून अधिकाधिक शेततळ्यांची जोड देऊन संपूर्ण पुरंदर तालुक्यात कृषी क्रांती घडवणार आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असून, हाताच्या पंजासमोरील बटण दाबून मताधिक्य द्यावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी विलास काळे, संपत काळे, माणिक काळे, अनंता काळे, तुकाराम झेंडे, अर्जुन काळे, किरण काळे, संतोष सोनवणे, अमृत माळवदकर, गणेश भिंताडे, रामचंद्र माळवदकर, दीपक काळे, नितीन काळे, जालिंदर काळे, सुनील शिंदे, नारायण काळे, पुष्पा काळे, देविदास कामथे, प्रकाश पवार, संभाजी काळाणे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संजय जगताप यांचे कोरोनातील योगदान, गावाला प्रथमच झालेल्या रस्त्यासाठीचा निधी, पुरंदर उपसा आणि अटल भूजलाच्या जलवाहिनीमुळे वाढलेले बागायत क्षेत्र, गावातील विविध पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीची मतरूपाने परतफेड करणार.
-मनीषा काळे, शेतकरी, सोनोरी
सोनोरीतील सोनोरी तथा मल्हारगड हा सर्वांत शेवटी बांधलेला किल्ला, अशी देशात ओळख असून, त्याला वेगळे महत्त्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किल्ल्यावर चांगले पर्यटन स्थळ आणि स्मारक करून जतन संवर्धनाचे काम करणार.
-संजय जगताप, आमदार
सोनोरी (ता. पुरंदर) : प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बैठकीत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

