सहकार मार्गदर्शन कार्यशाळा आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार मार्गदर्शन कार्यशाळा आज
सहकार मार्गदर्शन कार्यशाळा आज

सहकार मार्गदर्शन कार्यशाळा आज

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह निवडणूक कामकाजात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुणे जिल्हा को-ऑप. सर्टिफाइड ऑडिटर्स असोशिएनने शुक्रवारी (ता. २०) मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्यातील सहकारी संस्था या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांच्या निधीचे व्यवस्थापन करतात, तसेच राज्यातील सुमारे ५० टक्के जनता विविध माध्यमातून सहकारी संस्थाशी संबधित आहे. या संस्थांचे लेखापरीक्षण नियमित अचूक व कायद्याच्या चौकटीत होणे आवश्यक आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर आयुक्त ज्ञानदेव मुकणे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे सहनिबंधक तानाजी कवडे जिल्हा उपनिबंधक ग्रामीणचे मिलींद सोबले व जिल्हा उपनिबंधक शहर संजय राऊत यांच्यासह इतर मान्यवर या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार असल्याचे पुणे जिल्हा को - ऑप सर्टीफाइड ऑडीटर्स असोशिएनचे अध्यक्ष आनंद यादव यांनी सांगितले.