Wed, March 22, 2023

लोणीकंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे
टळली पाच लाखांची फसवणूक
लोणीकंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली पाच लाखांची फसवणूक
Published on : 15 February 2023, 12:47 pm
वाघोली, ता. १५ ः एका तरुणाची सुमारे पाच लाख रुपयांची झालेली ऑनलाइन फसवणूक लोणीकंद पोलिसांच्या सायबर सेलच्या तत्परतेने टळली आहे.
विजय नाथा रोटे यांची ४,९६,००० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. त्यांनी लोणीकंद सायबर सेलला तक्रार केल्यानंतर सायबर सेल पथकाने त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधत सूत्रे फिरवली. बँकेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाच्या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज गोरे, समीर पिलाणे, सागर पाटील, कीर्ती नरवडे, भोसले, गोरे, चव्हाण यांनी केली.