Fri, March 31, 2023

गोऱ्हे बुद्रुक येथे रास्ता रोको
गोऱ्हे बुद्रुक येथे रास्ता रोको
Published on : 12 March 2023, 2:14 am
खडकवासला, ता. १२ : पानशेत राज्य महामार्ग १३३ वरील गोऱ्हे बुद्रुक येथे रस्त्याचे रखडलेले काम आणि त्याच्या निकृष्ट दर्जाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना खडकवासला मतदारसंघ, सर्वपक्षीय ग्रामस्थ गोऱ्हे बुद्रुक यांच्या वतीने रास्ता रोको जनआंदोलन रविवारी करण्यात आले. रस्ता अडवल्यानंतर सर्व बांधकाम विभागाचे उपअभियंता दराडे व शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड आंदोलनस्थळी आले. पुढील आठ दिवसांत अपूर्ण काम चालू केले जाईल. तसेच कामाचा दर्जा सुधारण्यात येईल. तसेच येथील काम एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र येत्या आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आला.