साईनाथ मित्र मंडळातर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साईनाथ मित्र मंडळातर्फे 
महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
साईनाथ मित्र मंडळातर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

साईनाथ मित्र मंडळातर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By

सिंहगड रस्ता, ता. १४ : येथील आनंद नगर येथील साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि. धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-आॕप सोसायटीच्या सिंहगड रस्ता शाखेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता तसेच जय मल्हार आणि मराठी मालिका तसेच शिवप्रताप-गरुडझेप या सिनेमाचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कार्तिक केंढे यांनी इतिहासातील अनेक महिलांच्या बलिदान त्यागाचे दाखले देत हल्लीच्या घर सांभाळून बाहेर काम करणाऱ्या महिलांबाबत गौरवोद्गार काढले. या प्रसंगी स्नेहा राजे, अंकिता शानभाग, सिद्धी शेळके, निकीता फणसे, उत्तरा जोशी तर मंडळाचे प्रशांत मते व सीताराम गायकवाड उपस्थित होते. शाखाप्रमुख सुवर्णा मते यांनी सूत्रसंचालन केले.