समाविष्ट गावांतील प्रश्न सोडवावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाविष्ट गावांतील प्रश्न सोडवावेत
समाविष्ट गावांतील प्रश्न सोडवावेत

समाविष्ट गावांतील प्रश्न सोडवावेत

sakal_logo
By

खडकवासला, ता. १६ : पुणे महापालिकेत समाविष्ट असलेल्या पूर्वीच्या ११ व नव्या २३ अशा एकूण ३४ गावांतील शेड, अनधिकृत बांधकामांना लावलेला तिप्पट कर, पाणीपुरवठा, गुंठेवारी कायदा, मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे रेंगाळले काम अशा विविध प्रश्नांबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविला. समाविष्ट केलेल्या ३४ गावांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका कमी पडत आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेत आलेल्या गावांसाठी ४०० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. सांडपाण्याची लाईन टाकली जाणार आहे. त्यात दोन ठिकाणी जल शुद्धीकरण केंद्र सुरू करणार असल्याचे या वेळी उत्तरात सांगण्यात आले. महापालिकेत आलेल्या ३४ गावांत गुंठेवारी करण्यासाठी जास्त जाचक अटी आहेत. गुंठेवारी कायदा हा सुलभ पद्धतीने करावा, फुरसुंगी देवाची उरुळी गावे जास्त कर असल्यामुळे महापालिकेतून वगळणार आहे का, असा प्रश्न तापकीर यांनी उपस्थित केला. दरम्यान, या लक्षवेधीचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेत आलेल्या ३४ गावांच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही