न्यू कोपरे गावात 
२९ लाखांची घरफोडी

न्यू कोपरे गावात २९ लाखांची घरफोडी

Published on

खडकवासला, ता. १० ‌: चोरट्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून दागिने आणि रोकड असा सुमारे २९ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना न्यू कोपरे गावात सोमवारी घडली. अक्षय नाणेकर (वय ३०, रा. न्यू कोपरे) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी मध्यरात्री १२ ते पहाटे सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. नाणेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. तर नाणेकर हे कामानिमित्त त्यांच्या मित्राकडे गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून १२ लाखांची रोकड, एक मोबाईल, लॅपटॉप आणि २० तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे २९ लाख रुपयांचा ऐवज चोरी केल्याची माहिती फौजदार उमेश रोकडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.