कात्रज आगाराकडून 
सार्वधिक उत्पन्न!

कात्रज आगाराकडून सार्वधिक उत्पन्न!

कात्रज, ता. ११ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एकूण १५ मुख्य आगारातून जून महिन्यात ४९ कोटी १० लाख ९५ हजार ३३४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या आगाराच्या यादीत कात्रजचा पहिला क्रमांक लागतो. कात्रजकडून पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तर प्रतिदिन सरासरी १६ लाख ३५ हजार ५४८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
कात्रज आगाराकडून जून महिन्यात चार कोटी ९० लाख ६६ हजार ४३० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यानंतर निगडी आगाराकडून चार कोटी ८५ लाख ६५ हजार १२१ रुपये तर, सर्वांत कमी उत्पन्न हे बालेवाडी आगाराकडून एक कोटी ३९ लाख आठ हजार ८७४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये शाळा, कंपनी, वारी सोहळ्यासाठी देण्यात आलेल्या वाहनांचा समावेश नाही.


आकडे बोलतात
क्र- आगाराचे नाव-उत्पन्न (रुपयांमध्ये)
१) स्वारगेट- २ कोटी ६३ लाख ५७ हजार ४५१
२) नतावाडी- ३ कोटी ८६ लाख ७४ हजार २७२
३) कोथरूड- ३ कोटी ३७ लाख २३ हजार ३५५
४) कात्रज- ४ कोटी ९० लाख ६६ हजार ४३०
५) हडपसर- ३ कोटी ९७ लाख ८० हजार ८८३
६) मार्केट यार्ड- १ कोटी ८३ लाख १६ हजार ४३६
७) पुणे स्टेशन- ३ कोटी ६१ लाख ५७ हजार २३२
८) निगडी- ४ कोटी ८५ लाख ६५ हजार १२१
९) भोसरी- ३ कोटी ५५ लाख ८१ हजार ८६१
१०) पिंपरी - २ कोटी ५४ लाख २१ हजार २३१
११) भेकराईनगर- ३ कोटी २० लाख १७ हजार ९८२
१२) शेवाळेवाडी- १ कोटी ४६ लाख ९० हजार १०१
१३) बालेवाडी- १ कोटी ३९ लाख ८ हजार ८७४
१४) बाणेर - १ कोटी ७६ लाख ३० हजार ९०६
१५) वाघोली- २ कोटी ८५ लाख ६६ हजार ६०९
एकूण उत्पन्न - ४९ कोटी १० लाख ९५ हजार ३३४


शहरातील सेवा वाढविण्यात आली असून गरजेप्रमाणे बस सोडण्यात येतात. त्यामुळे या सर्वांचा फायदा झाला असून उत्पन्नाच्या बाबतीत कात्रज आगार पुढे आहे. हे उत्पन्न आणखी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे यश कात्रज आगाराच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आहे. आगामी काळात प्रतिदिन २० लाखापर्यंत म्हणजेच प्रतिमाह सहा कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.
- गोविंद हांडे, आगारप्रमुख, कात्रज आगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com