‘गार्नियर’ कलर कारला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गार्नियर’ कलर कारला उत्स्फूर्त प्रतिसाद

कात्रज, ता. २ : आपल्या केसांविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकाला केशसौंदर्य वाढविण्याची सोपी सुविधा ‘गार्नियर’ने उपलब्ध करून दिली. या उपक्रमाला पुणे शहरातील विविध भागांत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपले केस काळेभोर असावेत, असे अनेकांना वाटते. इतकेच नव्हे, तर संपूर्ण केसांना किंवा काही विशिष्ट बटांना आगळ्यावेगळ्या ढंगात रंगविण्यासही अनेकजण उत्सुक असतात. पण, पुरेशा माहितीअभावी ते शक्य होतेच असे नाही. हीच आवड ओळखून ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने राज्यभरात विविध ठिकाणी ‘गार्नियर’तर्फे खास मोहीम सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय सलूनसारख्या सुविधा असलेली कलर कार, प्रोफेशनल हेअर आर्टिस्टसह शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये फिरवून गार्नियरने मोफत केस रंगवून देत अनेकांना मोठी भेट दिली. शहरातील सातारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, कोथरूड, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, हडपसर, वडगावशेरी, औंध, बाणेर, कर्वे रस्ता अशा सर्व भागांतील महत्त्वाच्या सोसायट्यांमध्ये, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. केसांना रंगविणे, हे अतिशय खर्चिक काम असले तरीही या मोहिमेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा पूर्णपणे विनामूल्य दिली जात आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या असलेल्या या कलर कारमध्ये हेअर आर्टिस्ट केस रंगविण्याबरोबरच केसांच्या आरोग्याबाबत व व्यक्तिमत्वानुसार विविध कलर शेडबाबत माहिती देतात.
महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींचा हेअर कलरच्या उत्सुकतेबरोबरच हेअर कलरचे प्रकार, विविध कंपन्या, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या हेअर कलरमधील हार्मफुल घटक व फायदेशीर घटकांबाबतची माहिती जाणून घेण्याकडे कल दिसला आणि ही उत्सुकता ओळखून गार्नियर कलर कारने आपल्या या उपक्रमात रेग्युलर ब्लॅक व ब्राऊन या कलरसोबत बरगंडी, वाइन बरगंडी, लाइट ब्राऊन, कॅरंगल ब्राऊन, इन्सटन्स रेड, प्लम रेड, रासबेरी रेड व गोल्डन ब्राऊन हे फॅशन कलर उपलब्ध करून दिल्याने ते नागरिकांमध्ये औत्सुक्याचे ठरले.


मेहंदी आणि गार्नियर कलरमधील फरक
अनेक नागरिक कलरऐवजी मेहंदी लावत असल्याचे आढळून आले. परंतु, गार्नियर हेअर कलरचा अनुभव घेतल्यास त्यांना केसांना आलेली वेगळी शाईन, सिल्किपणा हे सुखद अनुभव होते. अनेकांनी गार्नियर हेअर कलर व त्यामध्ये असलेले घटक समजून घेतले व आम्ही यापुढे गार्नियर हेअर कलरच वापरणार असल्याचे सांगितले.


सोसायटीतील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. एकूणच सभासद आनंदी आहेत. सकाळ नेहमीच अशा प्रकारे उपक्रम राबवत असते त्यात आमच्या सोसायटीला प्राधान्य दिले याचा आनंद आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांचा नक्कीच गार्नियर हेअर कलर वापरण्याकडे कल वाढेल.
-योगेश चोरगे, नागरिक
--------------
आम्ही खूप दिवसांपासून सकाळचे वाचक आहोत. मात्र, बातम्यांसोबत असे उपक्रम राबविण्यात सकाळ कायम अग्रेसर राहिले आहे. आम्ही सुरुवातीच्या काळात मेहंदी वापरात असायचो. परंतु, आता केस कलर करतो. त्यात गर्नियर आणि सकाळच्या या संयुक्त उपक्रमामुळे केस आणि केस कलरचे महत्त्व आणखी समजले आणि या उपक्रमाचा लाभ घेतला.
-पल्लवी तावरे, सभासद, साई संस्कृती सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com