भीमा, कृष्णा खोऱ्यात पावसाची हजेरी

भीमा, कृष्णा खोऱ्यात पावसाची हजेरी

खडकवासला, ता. ६ : भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील ३९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. मागील महिन्याभरात पावसाला जोर नव्हता, मात्र त्यामुळे पाऊस पडूनही धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. धरणसाठ्यात प्रामुख्याने जुलै महिन्यात पाडणाऱ्या पावसामुळेच वाढ होत असते.
दोन्ही खोऱ्यांतील सर्व धरणांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन सात जूनच्या आसपास झाले आहे. मागील २२ दिवसांत ३९ धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.
कृष्णा खोऱ्यात १३ धरणे आहेत. एक जून पासून सातारा जिल्हा व तालुक्यातील कण्हेर धरणात सर्वात कमी १३२ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक एक हजार २२४ मिलिमीटर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाडगाव धरण पाणलोट क्षेत्रात झाला.
भीमा खोऱ्यात २६ धरणे आहेत. यात सर्वात कमी ३९ मिलिमीटर पाऊस पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणात झाला. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर धरणात सर्वाधिक ३३७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
भीमा खोऱ्यातील पाऊस
धरण ः ३० जून रोजी - एक जून पासूनचा पाऊस
पिंपळगाव जोगे ः ३ ३९
माणिकडोह ः १ ६२
येडगाव ः ० १७२
वडज ः ३ ५९
डिंभे ः ४ ११०
घोड ः ० २०३
विसापूर ः ० १०७
चिल्हेवाडी ः ३ ७०
कळमोडी ः ५ १०८
चासकमान ः ० १२९
भामा आसखेड ः ३ ९८
वडिवळे ः १४ १७९
आंद्रा ः ४ १२४
पवना ः १८ २२०
कासारसाई ः ५ १२१
मुळशी ः २८ २६६
टेमघर ः २७ २२७
वरसगाव ः २० १९५
पानशेत ः २० १९२
खडकवासला ः ४ १३७
गुंजवणी ः २४ २६४
नीरा देवघर ः ११ १९२
भाटघर ः ५ १६५
वीर ः ० १२२
नाजरे ः २ २१७
उजनी ः ० १५८
----
कृष्णा खोऱ्यातील पाऊस
धरण ः आजचा पाऊस ः एक जून पासूनचा पाऊस
कोयना ः ७१ ६९८
धोम ः ६ २०९
कण्हेर ः ९ १३२
वारणावती ः ३७ ४१५
दूधगंगा ः ५९ ५००
राधानगरी ः ३७ ६२९
तुळशी ः २८ ४३१
कासारी ः ९१ ७८७
पाटगाव ः ११७ १२२४
धोम बलकवडी ः ३४ ३१४
उरमोडी ः १३ १४७
येरळवाडी ः ३ १६६
तारळी ः ७ २३७
(आकडेवारी मिलीमीटरमध्ये)
===============

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com