शेवाळेवाडीत अपघात; एकाचा जागीच मृत्यू

शेवाळेवाडीत अपघात;
एकाचा जागीच मृत्यू
Published on

मांजरी, ता. ३ : पुणे-सोलापूर महामार्गावर रेडीमिक्स टँकर आणि ऑटो रिक्षामध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या रिक्षाचालकासह इतर चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.
नन्हे चव्हाण (वय ३५, सध्या रा. महादेवनगर, मांजरी बुद्रुक, मूळ कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. विष्णू प्रताप सिंह (वय ३८), पद्युम्न नरसिंह राज (वय २६), रवींद्र चव्हाण (वय ४३), सुनील संतोष पुराहा (वय २०) बेचू चव्हाण (वय ४५, सर्व रा. महादेवनगर, मांजरी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
ऑटो प्रवासी रिक्षा मांजरी फाटा चौकातून लोणी काळभोरच्या दिशेने जात होती. रिक्षामध्ये पाच कामगार प्रवासी बसले होते. येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपासमोरील चौकात सिग्नल नसतानाही रिक्षाने समोरील दुचाकीला कट मारण्याच्या नादात उजव्या बाजूने शहराकडे निघालेल्या रेडिमिक्सची वाहतूक करणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी नन्हे चव्हाण रस्त्यावर पडला असता, अंगावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. तर रिक्षाचालकासह इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com