केसनंदमधील कंपनीतील वायर चोरणाऱ्यावर गुन्हा

केसनंदमधील कंपनीतील 
वायर चोरणाऱ्यावर गुन्हा
Published on

वाघोली, ता. २५ : केसनंद रस्त्यावरील यझाकी इंडिया कंपनीत मागील दोन महिन्यांपासून दररोज वायरचे तुकडे चोरून नेल्याप्रकरणी एका हंगामी कामगारावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे मानव संसाधन प्रशासक सुनील सुवर्णा यांनी फिर्याद दिली असून, नवनाथ हाके असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. वायरिंगच्या साठ्यात तफावत येत असल्याने सीसीटीव्ही तपासले असता कामगार वायरिंगचे पाच ते सात तुकडे दररोज जॅकेटमध्ये लपवित असल्याचे दिसले. त्याला बोलावून विचारले असता, गेल्या दोन महिन्यांपासून दररोज वायरिंगचे तुकडे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. ४६ हजार ८०० रुपयांच्या ३६० तांब्याच्या तारा असलेले वायरिंगचे तुकडे चोरून नेल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com