छोट्या योगदानातूनच मोठी कार्य साकारतात प्रतापराव पवार यांचे प्रतिपादन
औंध, ता. २५ : ‘‘आपणास शक्य असलेल्या आर्थिक, श्रम, मार्गदर्शनासह त्याग व समर्पणाच्या भावनेने आपण छोट्या छोट्या स्वरूपात योगदान देऊन वाटचाल केल्यास भविष्यात समाजात बदल घडवणारी मोठमोठी कार्य साकारली जातात,’’ असे प्रतिपादन बालकल्याण संस्था व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.
औंध येथील बालकल्याण संस्थेच्या दिव्यांग मुला- मुलींच्या जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्यावतीने मदत करण्यात आली होती. या जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी देसाई ब्रदर्सचे नितीन देसाई, बालकल्याणचे विश्वस्त अवधूत वाळिंबे, शीला पद्मनाभन, शिल्पा पद्मनाभन, उपप्रांतपाल राजेंद्र गोयल, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरचे माजी अध्यक्ष सी. डी. शेठ, विद्यमान अध्यक्ष मिलिंद तलाठी, सचिव नीता शहा, अजित मांजरेकर, सतीश शाह, ‘बालकल्याण’च्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.
नितीन देसाई म्हणाले,‘‘समाजातील गरजू घटकांसाठी काम केल्याने आपणास आत्यंतिक समाधान मिळते व आपल्या सहकार्याने या घटकांना बळ मिळून प्रगतीला चालना मिळते.’’
यावेळी लायन राजेंद्र गोयल यांनी मनोगत व्यक्त केले. सी. डी. शेठ यांनी प्रास्ताविक केले. आभा दाते यांनी सूत्रसंचालन केले. नीता शाह यांनी आभार मानले. हा उपक्रम लायन सतीश शाह यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
--------------
फोटोः 72788
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.