सुरळीत वाहतुकीसाठी
अजित पवार मैदानात
खडकवासला मतदार संघात पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना

सुरळीत वाहतुकीसाठी अजित पवार मैदानात खडकवासला मतदार संघात पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना

Published on

खडकवासला, ता. ११ : खडकवासला मतदार संघातील वाहतूक कोंडीच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज थेट मैदानात उतरले. वारजे, न्यू अहिरेगाव, शिवणे, नांदेड आणि धायरी परिसरातील प्रमुख ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करत अनेक कामांना त्यांनी जागेवरच गती देण्याच्या सूचना दिल्या. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, दिलीप बराटे, बाबा धुमाळ आणि सायली वांजळे आदी उपस्थित होते.

वारजे डुक्करखिंड
-सेवा रस्त्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देणार
- पाच गुंठ्यांपेक्षा जास्त जमीनधारकांना रोख, त्यापेक्षा जास्त जागा असणाऱ्या मालकांना टीडीआर, एफएसआय द्या. -महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी

मुठा नदीपर्यंत डीपी रस्ता
-डीपी रस्ता पुढे मुठा नदीपर्यंत नेण्याचा निर्णय.
-नदीवर दोन्ही बाजूंना महापालिकेला पूल बांधण्याच्या सूचना
-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पालिकेचे अधिकारी उपस्थित


वारजे डुक्करखिंड – आंबेडकर चौक डीपी रस्ता:
वन विभागाच्या हद्दीची संयुक्त मोजणी पूर्ण, हद्द कायम केली नाही, तातडीने हद्द कायम करण्याबाबत उपवनसंरक्षकांना सूचना

बीडीपी रस्ते:
रस्त्यासाठी ०. ४ टीडीआरऐवजी एक एफएसआय देण्याचे निर्देश.

अहिरेगाव – जांभूळवाडी रिंगरोड :
याचा डीपीआर तयार करण्यासाठी पीएमआरडीएला सूचना
-बोगदा करता येईल का तपासणी
-संरक्षणमंत्र्यांची परवानगी आणणार

शिवणे–नांदेड पूल आणि नव्या पुलांचे पर्याय :
-तातडीने नवीन पूल बांधण्याच्या सूचना.
-सध्याचा शिवणे– नांदेड पूल तीन-चार ठिकाणी काटकोनात वळलेला
-पश्चिमेला जास्त उंचीचा नवीन पूल बांधणे
-कोंढवे–धावडे ते नांदेड सिटी दरम्यान नदीतील अंतर कमी असल्याने पूल बांधण्याचा महापालिकेचा पर्याय
-नांदेड सिटी मुठा नदीवरील पूल आणि दांगट इंडस्ट्रिअल इस्टेट (वारजे हद्द) येथे नवा पूल बांधण्याचा महापालिकेचा पर्याय

धायरी – बारांगणी मळा ते सिंहगड रस्ता डीपी रस्ता:
-जागा संपादनात अडथळा
-शेतकऱ्यांवर अन्याय न करता रस्ता सुरू करण्याचे निर्देश.
====================
फोटो ः 73342, 73343, 73344

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com