शहरी पूर व्यवस्थापनावर कार्यशाळा 
सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी राष्ट्रीय जल अकादमीचा पुढाकार

शहरी पूर व्यवस्थापनावर कार्यशाळा सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी राष्ट्रीय जल अकादमीचा पुढाकार

Published on

खडकवासला, ता. १० : शहरी भागांतील वाढत्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याच्या दिशेने पुण्यातील राष्ट्रीय जल अकादमी (एनडब्ल्यूए) येथे दोन दिवसीय शहरी पूर व्यवस्थापनावरील प्रशिक्षण मॉड्यूलच्या सह-विकासासाठी लेखन कार्यशाळेचे आयोजन केले होते. भारत–युरोपियन युनियन जल उपक्रम (आयइडब्लूआय) तिसरा टप्पा अंतर्गत जर्मन विकास सहकार्य संस्था (जीआयझेड) आणि डेन्मार्कच्या डॅनिश हायड्रॉलिक इन्स्टिट्यूट(डीएचआय) यांच्याशी सहयोगातून राबविलेल्या उपक्रमामुळे देशातील शहरी पूर व्यवस्थापन क्षमतेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारत- युरोपियन युनियन जल उपक्रम २०१६ पासून जलसंपदा व्यवस्थापन, नदी संवर्धन, पूर–दुष्काळ व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि प्रगत जलतंत्रज्ञान या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या टप्प्यात (२०२४–२७) शहरी पूर व्यवस्थापन, जलसंपदा डेटा व्यवस्थापन(डब्लूआरडीएम) आदी क्षेत्रातील विशेष तांत्रिक प्रशिक्षण विकसित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय जल अकादमीला देण्यात आली आहे.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता व प्रमुख डी. एस. चासकर होते. अकादमीचे आणि केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी, डेन्मार्क येथील डॅनिश हायड्रॉलिक इन्स्टिट्यूट(डीएचआय) तज्ज्ञ, भारत-युरोपियन युनियन जल उपक्रम–जर्मन विकास सहकार्य संस्थेचे प्रतिनिधी तसेच भारत हवामान विभाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई) बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था आणि इतर संस्थांतील विशेष तज्ज्ञांनी या लेखन कार्यशाळेत सहभाग घेतला.
दोन दिवसांच्या चर्चासत्रात भारतीय व युरोपियन तज्ज्ञांनी शहरी पूर व्यवस्थापनासंबंधी प्रगत तांत्रिक ज्ञान, अनुभव आणि उत्तम पद्धतींची देवाणघेवाण केली. प्रशिक्षण मॉड्यूलची उद्दिष्टे, व्याप्ती, अध्यापन पद्धती, कालावधी, सहभागींची रचना, सॉफ्टवेअर साधनांची आवश्यकता, उपलब्ध डेटा आणि समन्वय यंत्रणा आदी मुद्यांवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचे समन्वयन राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक आशिषकुमार सिंघल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com